Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, August 29, 2022

'आज बाळासाहेब ठाकरे ह्यात असते तर'

'आज बाळासाहेब ठाकरे ह्यात असते तर'

संजय राठोड 9764273121


चार अक्षरा पासून बनलेल्या 'शिवसेने'चा कायमाचा 'नामो'निशान' मिटविण्यासाठी भाजप, शिवसेनेचे बंडखोर आमदार,मनसे आदी राजकीय पक्ष आणि त्याचे नेते कामाला लागल्याचे दिसते.खरच शिवसेना भाजप सह इतर पक्षांना भारी पडतेय का? शिवसेनेतून चाळीस आमदारांनी बंडखोरी केली.नक्की या बंडखोर आमदारांच्या पाठीशी कोण होतं? हे कोणाला सांगण्याची गरज नाही.शिवसेना वाढविण्यात 'यवतमाळ जिल्हाचा' सिंहाचा वाटा राहिला आहे.तात्कालीन मुख्यमंत्री 'वसंतराव नाईक' यांच्या नावाने काही वर्ष शिवसेना 'वसंतसेना' म्हणुन पुढे ओळखल्या जाऊ लागली. बाळासाहेब ठाकरेंना वसंतराव नाईकांनी अडचणीत भरपूर मदत केल्याचे देखील काही जाणकार मंडळी सांगतात.

वसंतराव नाईक नंतर त्यांचे पुतणे माजी मुख्यमंत्री 'सुधाकरराव नाईकांनी' तर १९९३ मध्ये मुंबईमध्ये भाईगिरी करणाऱ्यांची दुकानदारी कायमाची बंद केली.त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेत 'सुधाकरराव नाईक' हिरो ठरले.आजही सेना भवन मध्ये वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक सोबत 'बाळासाहेब ठाकरेंचे अनेक फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळतात.

'आज बाळासाहेब ठाकरे ह्यात असते तर'
त्यावरून एकच लक्षात येते कि,नाईक आणि ठाकरे यांचे संबंध अतिशय जवळचे होते.मात्र आज बाळासाहेब ठाकरे ह्यात नाही,अशात 'उद्धव ठाकरें' याचं राजकारण करण्याची पद्धत खुप वेगळी आहे.विरोधक नेहमी सांगतात 'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिलेली नाही',हे देखील तेवढंच खर आहे.कारण बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना शिवसेना आक्रमक आणि तोडफोड करणारी होती.त्यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर किमान चाळीस ते पन्नास गुन्हे त्यांच्या वर दाखल असायचे. 

'आज बाळासाहेब ठाकरे ह्यात असते तर'
पदाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या पायऱ्या चढू नये असा 'सकारात्मक' विचार बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 'उद्धव ठाकरें'नी केला असावा? त्यामुळे शिवसेनेतील आक्रमकता कमी झाल्याचे दिसते.याचाच फायदा बंडखोर आमदारांनी आणि फडद्यामागून खेळी खेळणाऱ्या राजकीय नेत्यांनी घेऊन शिवसेना फोडली.त्यानंतर हिंदुत्व आमचं,बाळासाहेब ठाकरे आमचेच,दसरा मेळावा आमचाच,शिवसेना भवन आमचाच एवढाच काय तर धनुष्यबाण हि आमचाच असे म्हणायला देखील मागेपुढे ते पहात नाही आहे.सेनेचे बंडखोर आमदार 'भरत गोगावले' यांनी ज्या प्रकारे  'न्यायदान' बाबत व्यक्तव्य केले ते गंभीर आहे. निदान चार ते पाच वर्ष निकाल लागणार नाही", असे ते ठामपणे कसे काय सांगू शकतात? नक्की त्यांच्या कडे एवढा आत्मविश्वास आला तरी कुठून? घडणाऱ्या घडामोडी कडे पाहून थोडा कल्पना केली पाहिजे की,जर बाळासाहेब ठाकरे ह्यात असते आणि त्यांच्या डोळ्यापुढे भाजपने किंवा इतर पक्षाने अशी खेळी खेळली असती तर बाळासाहेबांनी काय केलं असतं याची कल्पना न केलेली बर.विरोधकांनी शिवसेना संपविण्याचा जो प्लान रचला होता तो कुठे तरी अंगावर आल्याचे दिसून येते?.शिवसेनेला देशभरात सहानुभूती मिळत आहे.फुकटात शिवसेना घराघरात पोहचल्यामुळे उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे आभार मानले पाहिजे..!


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages