Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, September 12, 2023

'जवान' मुळे अरूण कुमार आलाय चर्चेत'

'जवान' मुळे अरूण कुमार आलाय चर्चेत'

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा सगळीकडे सध्या बोलबाला सुरू आहे. या चित्रपटाने रिलीजनंतर पाच दिवसात जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय.आरोग्य,भष्ट्राचार,सैनिक आणि राजकीय घडामोडींवर या चित्रपटातून देशातील मतदारांना मतदानाचे महत्व पाठवून सांगण्याचा चांगला प्रयत्न केलाय. सरकरी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्या अभावी ६३ निष्पाप बालकांचा मृत्यू, त्यानंतर शस्त्र पुरवठा,शेतकरी आत्महत्या अशा अनेक मुद्यांवर चित्रपट बनवलाय.जवान या चित्रपटाचे दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि निर्माता अरूण कुमार ऊर्फ अॅटली हा ३८ वर्षाचा युवकाचा तामिळनाडूत दि.२१ सप्टेंबर १९८६ रोजी सामान्य कुटूंबात जन्म झाला.फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित राजारानी २०१३ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले, विजय पुरस्काराने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संवाद लेखकासाठी तामिळनाडू राज्य पुरस्काराने सन्मानित सुद्धा केले आहेत.

मी कोणत्याही घरात जन्मलो असेन,पण मी,माझे प्राक्तन बदलून टाकू शकतो.हा आजच्या पिढीला लागलेला शोध.मुद्दा आहे जग बदलण्याचा हा मार्क्सचा मुद्दा या पिढीला त्यांच्या अर्थाने समजला होता. त्यासाठी ना कोणत्या चळवळीची आवश्यकता होती, ना कोणत्या आदर्शवादानं झपाटून जाण्याची गरज होती.आजवर काही लोकांनी जगाकडे साम्यवादाच्या चष्म्याने पाहिलं कधी समाजवादाच्या, तर कधी हिंदुत्ववादी वा भांडवलवाद्यांच्या चष्मानं पाहिलं या पिढीने सगळे चष्मे उतरून ठेवले ती स्वच्छ डोळ्यांनी जगाकडे बघू लागली आहे.तिच्या डोळ्यातून खूप सारी स्वप्न आली ही स्वप्न आपण पूर्ण करू शकतो असा विश्वास वाटू लागला आजूबाजूच्या 'सक्सेस स्टोरीज'मुळे त्यांची खात्रीच पटली की,आपण जगावर राज्य करू शकतो. आपण जग जिंकू शकतो. तहसीलदाराचा फोन नंबर मिळायचा असेल तरी कठीण असलेला एक काळ होता. मात्र आता जगइतके जवळ आले की आपण साक्षात देशाच्या पंतप्रधानांना जाब विचारू शकतो. कोणाचीही खेचू शकतो, आणि कोणालाही डोक्यावर घेऊ शकतो ही शाश्वती आली. 

आपल्या हातात सगळी सत्ता आहे,आणि आपण सिलेब्रिटीइतकेच महत्त्वाचे आहोत,२०१० मध्ये 'फेसबुक'ने अनेक देशात क्रांती केली. इजिप्त सारख्या देशात होस्नी मुबारक नावाच्या सत्ताधीशाला पायउतार व्हावं लागलं. त्यात 'फेसबुक'चा वाटा किती यावर चर्चा होऊ शकते.पण, हे बंड मोडून काढण्यासाठी तिथल्या सरकारने इंटरनेट बंद केले.ट्युनिशियासारख्या छोट्या देशात जे घडलं तसंच पुढे भारतासारख्या महाकाय देशात झालं.मित्र हो,तो ३८ वर्षाचा जवानाच दिग्दर्शक अरूण कुमार याने रुपेरी पडद्यावर जे काही दाखवलं ते सर्वांना थक करणारं आहेत.यानिमित्याने एक मुद्दा उपस्थित होतो.की,बॉलिवुड दिग्दर्शक ऐवजी दक्षिणेकडील दिग्दर्शक प्रक्षेकांना आवडणारी चित्रपट देताहेत हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages